शिवसेनेची चिंता वाढली! एकनिष्ठतेचं प्रतिज्ञापत्र ज्यांनी दिलं, तेच शिंदे गटात गेले

| Updated on: Sep 30, 2022 | 9:30 AM

एकूण 6 जण शिंदे गटात सामील झाले, त्यातील 2 सरपंच होते. तर चौघांनी शिवसेनेला एकनिष्ठेचं प्रतिज्ञापत्र दिलं होतं.

मनोज लेले, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी : रत्नागिरीत (Ratnagiri Politics) जिल्ह्यातलं राजकारण तापलंय. शिंदे गटात (Eknath Shinde group) इनकमिंग सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवसेनेला (Shivsena Guhagar) एकनिष्ठ असल्याचं ज्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं, तेत शिंदे गटात सामील झालेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे रामदास कदम यांच्या दौऱ्यावर ही राजकीय घडमोड घडलीय. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढल्याचं बोललं जातंय. शिवसेनेचे गुहागरमधील 6 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. गुहागरमधील शिवसेनेचे चार पदाधिकारी आणि दोन सरपंच शिंदे गटात दाखल झाले. युवासेना प्रमुख अमरदिप परचूरे, युवासेना तालुकाप्रमुख सुमेध सुर्वे, युवासेना आंबलोली शाखा प्रमुख सुमेध सुर्वे, मंढरेचे सरपंच सुशिल आंग्रे, मासूचे सरपंच प्रकाश भोजने यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यासोबत घेतलेल्या भेटीचा फोटोदेखील समोर आलाय. या राजकीय घडामोडीनं कोकणातील राजकारण तापलंय.

Published on: Sep 30, 2022 09:30 AM
प्रताप सरनाईकांच्या अडचणी वाढल्या; गंभीर आरोप करत ठाणेकरांकडून जनहित याचिका  
100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 30 September 2022 -TV9