अजित पवार यांच्या इमेजला भाजप जाणीवपूर्वक डॅमेज करतेय; ‘या’ नेत्याचं टीकास्त्र
अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांवर भास्कराव जाधव यांची प्रतिक्रिया; भाजपवर तोफ डागली. म्हणाले...
चिपळूण, रत्नागिरी : अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या होतेय. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या इमेजला भारतीय जनता पार्टी जाणीवपूर्वक डॅमेज करतेय. पण यात काही तथ्य आहे की नाही याचा अजित पवार यांनी खुलासा करावा. अजित दादा पवार यांना जाणीवपूर्वक देशाचं नेतृत्व करण्यापासून दूर ठेवलं जात आहे. निर्णय घेण्याची वेळ अजित पवार यांची आहे. अजित पवार यांचा विषय हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे.जे वातावरण निर्माण झालंय. त्यात अडकून पडायचं की त्यातून बाहेर पडायचं हे अजितदादांनी ठरवायचं आहे. महाराष्ट्राचा रोखठोक बोलणारा नेता, त्यांच्याबद्दल अशी चर्चा होते याच्या आम्हाला वेदना होतात, असं भास्कराव जाधव म्हणाले आहेत.
Published on: Apr 18, 2023 01:44 PM