लोकांच्या जीवाशी खेळून राजकारण करत असाल, तर…; ठाकरे गटाच्या नेत्यानं भाजपला ठणकावलं
Ratnagiri Barsu Refinery Project News : रिफायनरी प्रकल्प अन् राजकारण; ठाकरे गटात्या नेत्याचं मोठं वक्तव्य
बारसू, रत्नागिरी : बारसूमधील रिफायनरी प्रकल्पाविरोधात सध्या आंदोलन केलं जातंय. ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांनी यावर भाष्य केलंय. लोकांची जीवाशी खेळून आपला पक्ष मोठा होण्यासाठी राजकारण करत असाल. विशेष करून भारतीय जनता पार्टीला सांगायचं आहे तर तुमचा असा पक्ष वाढणार नाही, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत. कोकणातील जनता खरं काय आणि खोटं काही समजून घेणारी जनता आहे. आंदोलन करणारी लोक ही कोणत्या राजकीय पक्षाची नाहीत. स्थानिक लोक आहेत. भारतीय जनता पार्टीला मी आव्हान दिलं होतं की, हा प्रकल्प तीन ते चार लाख कोटी रुपयांचा प्रकल्प येतोय लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प आहे. तर मग तुम्ही खुल्यापणाने चर्चा घडवा. मी स्वतः तिथे येतो, असंही ते म्हणालेत.
Published on: Apr 25, 2023 02:41 PM