Ratnagiri Road Accident : ट्रक-कारमध्ये भीषण अपघात! ड्रायव्हर गंभीर जखमी, गाडीचा अक्षरशः चेंदामेदा

| Updated on: May 02, 2022 | 10:04 AM

रत्नागिरी-जयगड-निवळी मार्गावरील निवळी इथं हा घडलेल्या या अपघाताच्या घडनेनंतर एकच खळबळ उडाली होती.

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कारचा भीषण अपघात झाला. या मध्ये कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. या अपघातात कारच्या छतासह दर्शनी भागाला मोठा फटका बसला. तर ट्रकचंही नुकसान झालंय. या अपघातानंतर दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रत्नागिरी-जयगड-निवळी मार्गावरील निवळी इथं हा घडलेल्या या अपघाताच्या घडनेनंतर एकच खळबळ उडाली होती. थोडक्यात मोठा अनर्थ या अपघातात टळलाय. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत तीन अपघात नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे अपघातांची मालिकाच संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतेय. नेमका निवळी इथं झालेला अपघातत कोणत्या कारामुळे झाला, हे कळू शकलं नाही. मात्र भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा, अशी शंका उपस्थित केली जातेय.

 

Published on: May 02, 2022 10:03 AM
कर्नाटकात मुसळधार पाऊस
मनसे कार्यकर्त्यांवर मोक्का लावण्याची आसिफ शेख यांची मागणी