उदय सामंत यांच्या भावाची राजकारणात एन्ट्री होण्याची शक्यता

| Updated on: Oct 23, 2022 | 10:52 AM

मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत राजकारणात एन्ट्री करण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत राजकारणात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. किरण सामंत राजकारणात सक्रीय होणार असल्याचं बोललं जात आहे. सिंधूरत्न योजनेच्या कार्यकारी समितीवर त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.उदय सामंत यांच्या सोबत सर्वच राजकीय घडामोडीत किंगमेकर म्हणून किरण सामंत (Kiran Samant) यांचा उल्लेख केला जातो. आता राजकारणात सक्रिय इन्ट्री किरण सामंत करणार असल्याची शक्यता आहे.

Published on: Oct 23, 2022 10:51 AM
पहा राज्याच्या राजकारणात नक्की काय सुरू आहे. कोणी केली टीका कोणी दिलं उत्तर. पहा फक्त टॉप 9 न्यूजमध्ये
तुम्ही 50 खोके घेतले, शेतकऱ्यांना किमान 50 पेट्या तर द्या, चंद्रकांत खैरेंचा सत्तारांना खोचक टोला