‘…पण सरकार हे वेताळाप्रमाणे हट्टाला पेटलं आहे’; मणिपूरवरून राऊत यांची भाजपवर टीका

| Updated on: Aug 02, 2023 | 12:42 PM

यावेळी राऊत यांनी, या सरकारला आणि पंतप्रधान मोदी यांना मणिपूर मणिपूर हिंसाचार, महिलांवर अत्याचार आणि महिलांची काढलेली नग्न धिंड याबाबत पंतप्रधान मोदी किंवा या सरकारला कोणतीच चिंता नाही. पण त्यावर सर्वोच्च न्यायलयाने चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2023 | मणिपूर हिंसाचार, महिलांवर अत्याचार आणि महिलांची काढलेली नग्न धिंड यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी राऊत यांनी, या सरकारला आणि पंतप्रधान मोदी यांना मणिपूर मणिपूर हिंसाचार, महिलांवर अत्याचार आणि महिलांची काढलेली नग्न धिंड याबाबत पंतप्रधान मोदी किंवा या सरकारला कोणतीच चिंता नाही. पण त्यावर सर्वोच्च न्यायलयाने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे या हिंसेप्रकरणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक शिष्टमंडळ भेटणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच मणिपूरची स्थिती राष्ट्रपती यांना माहिती देणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर मणिपूरबाबत इंडियाच्या माध्यमातून संसदेत आणि संसदेच्या बाहेर देखील आवाज उठवला जाईल असेही राऊत यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 02, 2023 12:42 PM
“महाराष्ट्राच्या भावना तुडवण्याचा प्रयत्न…”; पवार-मोदी भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
मुद्द्याचं बोला…! विधानभवन परिसरात रोहित पवार यांच्या टी-शर्टची जोरदार चर्चा