‘एव्हाना अजित शाह येऊन पोहचले असते, मात्र…’; ठाणे मृत्यू तांडववरून राऊत यांचा निशाना
एकाच रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला. तर एका आठवड्यात तब्बत 22 रूग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप आणि भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर निशाना साधला आहे.
मुंबई, 14 ऑगस्ट 2023 | ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काल मोठी दुर्दैवी दुर्घटना घडली. ज्यात एकाच रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला. तर एका आठवड्यात तब्बत 22 रूग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप आणि भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर निशाना साधला आहे. यावेळी राऊत यांनी, मुख्यमंत्री हे आराम करायला महाबळेश्वरच्या पायथ्याशी जातात मात्र त्यांना ठाण्यातील हा आक्रोश ऐकू जात नाही. त्यांचा आक्रोश कोणी ऐकायचा. हेच जर दुसऱ्या राज्यात झालं असतं तर गृहमंत्री अमित शाह लगेच तेथे चौकशीसाठी पोहचले असते आणि सरकारला प्रश्न विचारले असते. येथे जे त्यांचे पोपटलाल आहेत, जे मुंबईतील कोविड सेंटरमधील घोटाळे काढत सुटतात त्यांनी या मृत्यू प्रकरणावर साधं दुख देखील व्यक्त केलेलं नाही. त्यांनी येथील भ्रष्टाचारावर का बोललं नाही असा सवाल नाव न घेता सोमय्या यांना केला आहे. तर यावरून भाजपने देखील प्रश्न विचारला आहे का? याचं कारण मुंबई ठाण्यासह १४ महापालिकेत लोकप्रतिनिधींच राज्य नाही. तर भाजपने प्रशासन आपल्या हातात ठेवलं आहे. त्यामुळे कोणाचा पायपोस कोणाच्या हातात नाही.