राधानगरी (कोल्हापूर) : पावसाळा आला की अनेक जणांना खूनावतो तो धबधबा. कोल्हापूर जिल्ह्यातही असे अनेक छोटे मोटे धबधबे आहेत जिथे पर्यटनासाठी नागरिक जाणे पसंत करताता. असाच अल्पावधीतच राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबाही नावारूपास आला आहे. कोल्हापूर शहरासह आसपासचे अनेक पर्यटन हे राऊतवाडी धबधबा पाहण्यासाठी जात असतात. मात्र यावेळी जून महिना संपत आला तरी तो प्रवाहीत झाला नव्हता. मात्र गेल्या 24 तासात चांगला पाऊस कोकण पट्ट्यात झाला आहे. तर राधानगरी, दाजीपूरसह परिसरात दोन दिवसापासून पावसाला सुरवात झाल्याने धबधबा पहिल्या पावसातच प्रवाहित झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची पसंती असणारा धबधब्याची नयनरम्य दृश्य