अडसूळ यांच्या दाव्यावर आमदार राणा यांचा पलटवार; म्हणाले, ‘अडसूळ हेच नवनीत राणांचा प्रचार करतील’
याचदरम्यान शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ अथवा माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी या मतदार संघावर दावा ठोकला आहे. त्यावरून अपक्ष आमदार आणि खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून अमरावती लोकसभा मतदारसंघावरून भाजपसह युतिची डोकेदुखी वाढली आहे. येथे खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांच्या संकंटात वाढ होताना दिवसेंदिवस दिसत आहे. याचदरम्यान शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ अथवा माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी या मतदार संघावर दावा ठोकला आहे. त्यावरून अपक्ष आमदार आणि खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी, अमरावती लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदार नवनीत राना याच निवडणुकीच्या रिंगणात असतील असे म्हटलं आहे. त्याचबरोबर माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ हे देखील खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील ही काळा दगडावरील रेष असल्याचं म्हणत अडसूळ यांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर आता राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची निवड होत असल्यानेच अनेक जण असा दावा करत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.