Video : नवनीत राणा हनुमान चालिसेवर ठाम, शिवसैनिक आजी म्हणतात, ‘झुकेंगा नहीं’!
आज राज्याच्या राजकारणात मातोश्री आणि राणा दाम्पत्य यांची जोरदार चर्चा आहे. आज सकाळपासूनच मुंबईत शिवसैनिकांनी आज सकाळी राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन केलं. राणा दाम्पत्यानं घराबाहेर पडून दाखवावं, अशी धमकी दिली. त्यासाठी शेकडो शिवसैनिक राणा यांच्या घरासमोर जमले होते. पोलिसांनी त्यांना थांबविलं. तरीही राणा दाम्पत्य मातोश्रीवर (Matoshri) हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणण्यावरून ठाम होते. यात राणा […]
आज राज्याच्या राजकारणात मातोश्री आणि राणा दाम्पत्य यांची जोरदार चर्चा आहे. आज सकाळपासूनच मुंबईत शिवसैनिकांनी आज सकाळी राणा दाम्पत्याच्या घरासमोर आंदोलन केलं. राणा दाम्पत्यानं घराबाहेर पडून दाखवावं, अशी धमकी दिली. त्यासाठी शेकडो शिवसैनिक राणा यांच्या घरासमोर जमले होते. पोलिसांनी त्यांना थांबविलं. तरीही राणा दाम्पत्य मातोश्रीवर (Matoshri) हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणण्यावरून ठाम होते. यात राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर शिवसैनिक जमले होते. यात एक आजीबाई आक्रमकपणे बोलातना पाहायला मिळाल्या. जणू त्या मातोश्रीची रक्षा करण्यासाठी आल्या आहेत, असं त्यांच्या वागण्यातून जाणवत होतं. या आजींची सध्या सध्या जोरदार चर्चा आहे. या आजीबाईंनी शिवसेनेच्या वतीने पुष्पा स्टाईलमध्ये राणा दाम्पत्याला प्रत्युत्तर दिलंय. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिग आहे. यावेळी बोलताना राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन दाखवावं, असं आव्हान दिलं. येण्याची अशी हिंमत कुण्याच्यात नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर येऊन दाखवा, असं या आजी म्हणाल्या.