उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा; पण अमरावतीचा ‘हा’ आमदार म्हणतो, “पक्ष फुटल्यानंतर …”
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते यतमाळमध्ये होते.पोहरादेवी येथे बामनलाल महाराज मंदिर येथे त्यांच्या हस्ते होम पूजेमध्ये नारळ अर्पण करून आहुती टाकली. त्यामुळे पोहरादेवी येथे सुरक्षेच्या कारणाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला आहे. मात्र, यादरम्यान अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केलीय.
यवतमाळ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते यतमाळमध्ये होते.पोहरादेवी येथे बामनलाल महाराज मंदिर येथे त्यांच्या हस्ते होम पूजेमध्ये नारळ अर्पण करून आहुती टाकली. त्यामुळे पोहरादेवी येथे सुरक्षेच्या कारणाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला आहे. मात्र, यादरम्यान अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केलीय. “मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाही. कोरोना काळात राज्याला वाऱ्यावर सोडून हे मातोश्रीवर बसले होते. आता पक्ष फुटल्यानंतर ते विदर्भाचा दौरा करत आहेत. आता तर तुमचे 40 आमदार सोडून गेले ते फक्त हनुमान चालीसाला विरोध केला”, म्हणून अशी टीका रवी राणा यांनी केली.
Published on: Jul 09, 2023 04:29 PM