Amravatiमध्ये घडलेल्या शाईफेक घटनेदरम्यान Ravi Rana अमरावतीत नव्हते – Navneet Rana
शाईफेक करते वेळी रवी राणा हे अमरावतीत नव्हते. ते विमानप्रवास करत होते. मात्र त्यांच्यावर रात्री मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश आल्यावर 307सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा सभागृहात बोलताना केला.
अमरावतीमधील(Amravati) शिवाजी महाराज यांचा पुतळ्या हटवल्याचा राग म्हणून पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक (Ink thrown) केल्याने आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र शाईफेक करते वेळी रवी राणा हे अमरावतीत नव्हते. ते विमानप्रवास करत होते. मात्र त्यांच्यावर रात्री मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश आल्यावर 307सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा सभागृहात बोलताना केला. ठाकरे सरकारविरोधात जे बोलणार त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. तर महाराष्ट्रात संविधानाची हत्या केली जात आहे, असा आरोपही नवनीत राणा यांनी केला. अमरावतीत मागील काही दिवसांपासून पुतळ्याचे राजकारण रंगत आहे. त्यावरून आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. आता या प्रकरणालाही राजकीय वळण लागले आहे.