Rana Couple Case : जामिनाची प्रक्रिया बोरीवली कोर्टातून पूर्ण होण्यासाठी उशीर

| Updated on: May 04, 2022 | 8:01 PM

मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला दिलासा दिला असला तरीही काही तांत्रिक अडचणींमुळे रवी राणा यांना आजची रात्रही तळोजा जेलमध्येच काढावी लागणार आहे.

मुंबईः अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना आज मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असूनही आजची रात्र त्यांना कोठडीतच काढावी लागणार आहे. राणा दाम्पत्य यांना मुंबईतील तळोजा कारागृहात (Taloja Jail) ठेवण्यात आलं होतं. आज न्यायालयाने त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला. मात्र तळोजा कारागृहात त्यांच्या जामीनाच्या ऑर्डरची कॉपीच पोहोचली नाही. त्यामुळे आमदार रवी राणा यांना आजची रात्रही कोठडीतच काढावी लागणार आहे. नवनीत राणा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे आज नवनीत राणा रुग्णालयात तर रवी राणा हे तळोजा कारागृहात मुक्कामी असतील.

Published on: May 04, 2022 08:01 PM
संदीप देशपांडेंवर ‘या’ कलमांतर्गत गुन्हा दाखल
Eknath Khadse on OBC Reservation | सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी