भाजप प्रवेशाच्या चर्चांना तुपकर यांच्याकडून ब्रेक, राजू शेट्टी यांच्याकडे केली कोणती विनंती?

| Updated on: Aug 08, 2023 | 10:58 AM

तुपकर हे भाजपमध्ये जातील अशा चर्चांना उत आला होता. तर ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. याचदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने थेट तुपकर यांना आदेशच काढला होता.

बुलढाणा, 8 ऑगस्ट 2023 । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर थेट रविकांत तुपकर यांनी आरोप केले होते. तसेच त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता तुपकर हे भाजपमध्ये जातील अशा चर्चांना उत आला होता. तर ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. याचदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने थेट तुपकर यांना आदेशच काढला होता. तसेच पुण्यात होणाऱ्या बैठकीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यानंतर तुपकर हे नॉटरिचेबल झाले होते. यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर आला होता. मात्र आज तुपकर हे थेट मिडियाच्या समोर येत आपली भूमिका मांडली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना ब्रेक लावला आहे. तर तुपकर यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगितलं. याचंबरोबर त्यांनी यावेळी राजू शेट्टी यांच्याकडे विनंती देखील केली. पाहा काय केली विनंती ती…

Published on: Aug 08, 2023 10:58 AM
बेस्ट बस कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संप, मालवणी डेपोत पोलीस बंदोबस्त; प्रवाशांच्या अडचणीत वाढ
नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान बेपत्ता, व्यावसायिक कामानिमित्त गेल्या अन्…