‘सरकार असंवेदनशिल.. पूरग्रस्तांचे पुनर्वसन करा.. अन्यथा’; तुपकर सरकारवर बरसले
येथे मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे महापुर आला. तर आलेल्या महापुराचा फटका येथील हजारो हेक्टर शेतीला बसला. त्यामुळे पिकांचे शेतीचे आणि घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. घरांचे नुकसान झाल्याने अनेक संसार उघड्यावर आली आहेत.
बुलढाणा, 06 ऑगस्ट 2013 | बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगांव जामोद तालुक्यात यंदा झालेल्या पावसामुळे हाहाकार माजला आहे. येथे मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे महापुर आला. तर आलेल्या महापुराचा फटका येथील हजारो हेक्टर शेतीला बसला. त्यामुळे पिकांचे शेतीचे आणि घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. घरांचे नुकसान झाल्याने अनेक संसार उघड्यावर आली आहेत. लोकांना खायला नाही की राहायला काहीच नाही. त्यामुळे सरकारकडे मदतीच्या आशेने बळीराजा आणि लोक बघत आहेत. मात्र हे सरकार असंवेदशील दिसत आहे. सरकारने पाच हजार रुपये मदतीची घोषणा केली. पण ती मदत काही त्यांच्यापर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे अशा पूरग्रस्त शेतकरी आणि पूरग्रस्तांना तात्काळ मदत व्हावी. तर त्यांचे आठवडा भरात तत्काळ पुनर्वसन करा.. अन्यथा सरकार हलविल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलाय आहे.