स्वाभिमानी शेतकरी संघटना हायजॅक करण्याचा प्रयत्न होतोय का? राजू शेट्टी स्पष्टच बोलले…
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर रविकांत तुपकर यांनी आक्षेप घेतला आहे. रविकांत तुपकर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर दावा ठोकणार असल्याची चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.
सोलापूर, 5 ऑगस्ट 2023 | शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता स्वाभिमीनी शेतकरी संघटनेत फूट पडण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर रविकांत तुपकर यांनी आक्षेप घेतला आहे. रविकांत तुपकर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर दावा ठोकणार असल्याची चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना हायजॅक होणार नाही, ती शेतकऱ्यामधून, तळगळातून ही संघटना तयार झाली आहे.
Published on: Aug 05, 2023 02:12 PM