मला संधी दिल्यास विजय निश्चित; उमेदवारीची घोषणा होण्याआधी रवींद्र धंगेकर यांची tv9 वर Exclusive प्रतिक्रिया
कसबा आणि पिंपरी-चिंचवड निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपले उमेदवार निश्चित केले असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार रवींद्र धंगेकर यांची tv9 वर Exclusive प्रतिक्रिया दिलीय. ते काय म्हणालेत? पाहा...
पुणे : कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपले उमेदवार निश्चित केले असल्याची माहिती आहे. अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसब्याची जागा कॉंग्रेस लढवणार आहे. तर पिंपरी-चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढणार असल्याची माहिती आहे. कसब्यातून काँग्रेस नेते रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. तर उमेदवारीची घोषणा होण्याआधी धंगेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. तेव्हा उमेदवारी दिल्यास संधीचं सोनं करणार. मला संधी दिल्यास विजय निश्चित आहे, असं रविंद्र धंगेकर म्हणालेत
Published on: Feb 04, 2023 12:36 PM