अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे येणार? पाहा रवींद्र धंगेकर यांचं सूचक विधान…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. शरद पवार यांचा गट हा मविआमध्ये राहिला. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी सूचक विधान केलं आहे.
पुणे, 01 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. शरद पवार यांचा गट हा मविआमध्ये राहिला. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी सूचक विधान केलं आहे. ते म्हणाले की, “अजित पवार हे शरद पवार यांच्याकडे पुन्हा येऊ शकतात. शेवटी हा राजकारणाचा भाग आहे. कौटुंबिक नाती कधी तुटत नाही.”
Published on: Aug 01, 2023 10:18 AM