मलाही वाटतं की राज्याचा मुख्यमंत्री व्हावं- रविंद्र धंगेकर
राज्याचं मुख्यमंत्रिपद, आकांक्षा अन् राजकीय परिस्थिती; आमदार रविंद्र धंगेकर यांचं मोठं वक्तव्य. पाहा व्हीडिओ...
पुणे : राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. मुख्यमंत्री व्हायची इच्छा कुणाला नसते. मलाही वाटतं की राज्याचा मुख्यमंत्री व्हावं, असं रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत. काल सोलापुरात बोलताना त्यांनी वक्तव्य केलं. याची जोरदार चर्चा झाली. त्यावर आता धंगेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझी इच्छा मी बोलून दाखवली.सगळ्यांना वाटतं की आपण मुख्यमंत्री व्हावं. तसं मलाही वाटतं की मुख्यमंत्री व्हावं. काल पत्रकार मित्रांनी विचारलं म्हणून मी तसं म्हणालो, असं धंगेकर म्हणालेत. तसंच अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्यावरही धंगेकर यांनी भाष्य केलंय. अजित दादा खूप मोठे नेते आहेत. ते मुख्यमंत्री व्हावं असं मलाही वाटतं, असंही धंगकर यांनी म्हटलं आहे.
Published on: Apr 25, 2023 02:58 PM