“संजय राऊत यांच्यावर आक्षेप घेताना तुम्ही स्वत: आक्षेपार्ह भाषा वापरता, पटलं पाहिजे…”
"एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बनावट शिवसेना आहे. ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे", असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापुरात केलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतलाय. पाहा...
मुंबई : कोल्हापुरात बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करताना ‘चोरमंडळ’ शब्द वापरला. यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्षेप घेण्यात आला. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी टीका केली. यावेळी बोलताना गोगावले यांच्याकडून आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आला. माणसाने भाड खायला पाहिजे पण एवढंही XXXX नसायला पाहिजे, असं गोगावले म्हणाले. गोगावले यांच्या वक्तव्यावर ठाकरेगटाचे आमदार रविंद्र वायकर यांनी आक्षेप घेतला. राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेता अन् त्याचवेळी स्वत: मात्र आक्षेपार्ह भाषा वापरता हे योग्य नाही, असं वायकर म्हणाले.
Published on: Mar 01, 2023 02:58 PM