रविकांत तुपकर यांनी बैठकीपूर्वीच जाहीर केली भूमिका; म्हणाले…

| Updated on: Aug 08, 2023 | 11:33 AM

रविकांत तुपकर हे आजच्या पुण्यातील बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान याचं कारण स्वत: रविकांत तुपकर यांनी सांगितलं आहे.

बुलढाणा, 8 ऑगस्ट 2023 | स्वाभिमानी पक्षाच्या शिस्तपालन आणि कोअर कमिटीची आज पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. आजच्या विशेष बैठकीत रविकांत तुपकर यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आजच्या बैठकीला राजू शेट्टी हे उपस्थित राहणार आहेत. रविकांत तुपकर हे आजच्या पुण्यातील बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे. मागच्या काही दिवसांपासून रविकांत तुपकर हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची राज्यात चर्चा सुरु आहे. त्यामुळे आजच्या पुण्यातील बैठकीकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. दरम्यान आजच्या बैठकीत का गैरहजर राहणार याचं स्पष्टीकरण स्वत: रविकांत तुपकर यांनी दिलं आहे.

Published on: Aug 08, 2023 11:32 AM
‘…आत्ता महाराष्ट्रातील राज्यपाल कुठे आहेत?’; संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका
दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीत शरद पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘मी भाजपसोबत…’