राज्यात पुन्हा निवडणुकीचे पडघम, 1 मार्चपासून निवडणूक प्रक्रियेला सुरवात

| Updated on: Feb 17, 2023 | 11:24 AM

विधान परिषद निवडणूक पाठोपाठ विधानसभेच्या कसबा आणि चिचवड पोट निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. हा राजकीय धुरळा विरत नाही तोच आता १ मार्चपासून पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.

पुणे : विधान परिषद निवडणूक पाठोपाठ विधानसभेच्या कसबा आणि चिचवड पोट निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. हा राजकीय धुरळा विरत नाही तोच आता 1 मार्चपासून पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. राज्यातील 21 हजार राज्य सहकारी संस्थांच्या निवडणूक होणार आहेत. या निवडणुकांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आदेश जारी केले आहेत. 1 मार्चपासून या निवडणूक प्रक्रियेला सुरवात होणार आहे. या आदेशानुसार 1 एप्रिल 2021 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत निवडणुकीस पात्र अ, ब, क आणि ड वर्गातल्या एकूण 20 हजार 638 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया 1 मार्चपासून सुरु होणार आहेत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 15 फेब्रुवारी 2023 रोजी हे आदेश दिले आहेत. मात्र, यातून कृषि पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था यांना वगळण्यात आले आहे.

Published on: Feb 17, 2023 11:24 AM
पुणे महापालिकेचा पुणेकरांना मोठा दिलासा, कराबाबत कोणता घेतला निर्णय? बघा व्हिडीओ
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली, कधी होणार पुढील सुनावणी?