भुजबळ आणि मुंडे यांना आलेल्या धमकीवर रोहित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, ‘आपला हा शॉर्टकट नाही’
अजित पवार आणि त्यांच्या गटाने थेट सरकारमध्ये सामिल होत अनेकांना धक्का दिला आहे. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि इतर आठ नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्यातील सामान्य राष्ट्रवादी कार्यकर्ता हा दुखावला आहे.
अहमदनगर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही जोरदार राजकारण सुरू आहे. अजित पवार आणि त्यांच्या गटाने थेट सरकारमध्ये सामिल होत अनेकांना धक्का दिला आहे. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि इतर आठ नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्यातील सामान्य राष्ट्रवादी कार्यकर्ता हा दुखावला आहे. यातून काल नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भुजबळ यांच्या धमकीप्रकरणी प्रशांत पाटील नावाच्या तरूणाला पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलंय. तर धनंजय मुंडे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने 50 लाखांची मागणी केल्याचे समोर येत आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, अशा पद्धतीने देण्यात आलेली धमकी योग्य नाही. तर राजकीय आव्हान करणं आपण समजू शकतो. पण अशा पद्धतीने धमकी देणे बरोबर नाही. युवा पिढीला सुद्धा मला सांगायचं की धमकी देणे हा सगळा शॉर्टकट झाला. आपल्या संघर्ष करायचाय. पवार यांनी संघर्षाची भूमिका स्वीकारलेली आहे. त्यामुळे हे शॉर्टकट जे या नेत्यांनी घेतले अशा पद्धतीने शॉर्टकट न घेता आपल्या संघर्ष करायचा आहे.