Devendra Fadnavis | मोदीजींच्या सोबत महाराष्ट्र उभा करत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहिल

Devendra Fadnavis | ‘मोदीजींच्या सोबत महाराष्ट्र उभा करत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहिल’

| Updated on: Jun 21, 2022 | 12:47 AM

काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारापेक्षा जास्त मते आमच्या पाचव्या उमेदवाराने घेतली. मी पुन्हा एकदा आमच्या जगताप आणी टिळक यांनी एवढ्या आजारी असूनही ते मतदानाला आले, त्यांच्या जिद्दीला सलाम करतो. देशात मोदींजींची लहर आहे आणि महाराष्ट्र मोदींजी सोबत आहे, असी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मुंबई : मविआत किती आसंतोष आहे तो आज या निकालातून जाहीर झाले. मी विरोधी पक्षातील आमदारांचे आभार मानतो, ज्यांनी आम्हाला मदत केली आणि अपक्षांचे पण मी आभार मानतो. जोपर्यंत सत्तापरीवर्तन होणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालू राहणार आहे. या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. राज्यसभेच्या निवडणूकीत आम्ही 123 मते घेतली होती. आता आम्ही 134 मते घेतली आहेत. मविआत खूप नाराजी आहे. काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारापेक्षा जास्त मते आमच्या पाचव्या उमेदवाराने घेतली. मी पुन्हा एकदा आमच्या जगताप आणी टिळक यांनी एवढ्या आजारी असूनही ते मतदानाला आले, त्यांच्या जिद्दीला सलाम करतो. देशात मोदींजींची लहर आहे आणि महाराष्ट्र मोदींजी सोबत आहे, असी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Published on: Jun 21, 2022 12:47 AM
Bhai Jagtap | ‘मतं फुटल्याबाबत गांभीर्यानं विचार व्हायला हवं’
Prasad Lad | ‘जिंकणार याबाबत विश्वास होता’;विजयानंतर लाडांची प्रतिक्रिया