Santosh Bangar | ‘गाडी तुमच्या दारात आणतो फक्त टच करुन दाखवा’
आमच्या गाड्यांना स्पर्श जरी करून दाखवला तर हा संतोष बांगर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.
हिंगोली : आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर आज आमदार बांगर आणि खासदार हेमंत पाटलांना शिवसैनिकांनी चिथावणी दिली. संपर्क प्रमुखांनी गाड्या फोडण्याचे आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. यावर बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही या माणसाला पुरून उरू एवढी ताकद या शिवसेनेच्या मावळ्यामध्ये, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या मावळ्यामध्ये आहे. यांनी सांगितले की, माझी गाडी फोडू, हेमंत पाटलांची गाडी फोडू. अहो आमच्या गाड्या तुम्ही काय फोडता आमच्या गाड्या तुमच्या घरापुढे आणून उभ्या करतो. आमच्या गाड्यांना स्पर्श जरी करून दाखवला तर हा संतोष बांगर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.
Published on: Aug 02, 2022 12:59 AM