Special Report | मुलांचा टीईटी घोटाळा, अब्दुल सत्तारांची मंत्रिपदाची संधी हुकणार
बंडखोर आमदार या प्रकरणात दोषी आढळले तर त्यांचे मंत्रिपद हुकण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार आपल्यावर खोटे आरोप केले जात असून या प्रकरणाची चौकशी लावण्यात आली तर आपण त्या चौकशीला सामोरे जाऊ असंही त्यांनी सांगितले आहे.
शिंदे-फडणवीस यांनी शपथ घेऊन 38 दिवस झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला असताना बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांचा टीईटी घोटाळा आता समोर आला आहे. त्यामुळे विरोधकांना आता अब्दुल सत्तारांचे आयते कोलीतच हातात मिळाले आहे. 2019-20 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा झाली, त्यामध्ये त्यांची मुलं अपात्र ठरूनही त्यांच्या मुलांनी पगार घेतला असल्याचे निष्पण्ण झाले आहे. त्यामुळे आता हा वाद विकोपाला जाण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे. बंडखोर आमदार या प्रकरणात दोषी आढळले तर त्यांचे मंत्रिपद हुकण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार आपल्यावर खोटे आरोप केले जात असून या प्रकरणाची चौकशी लावण्यात आली तर आपण त्या चौकशीला सामोरे जाऊ असंही त्यांनी सांगितले आहे.