राज्यात आजपासून पावसाचा जोर कमी होणार, हवामान विभागाने दिली माहिती

| Updated on: Jul 30, 2023 | 9:53 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस बरसतोय. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर, भूस्खलनाच्या घटना घडल्या. असं असताना येत्या काही दिवसात सततच्या पडणाऱ्या पावसापासून काहीसा दिलासा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 30 जुलै, 2023 | गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस बरसतोय. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर, भूस्खलनाच्या घटना घडल्या. जोरदार पावसामुळे अनेकांचं जीवन विस्कळीत झालं. शेतीपिकांचं नुकसान झालं. असं असताना येत्या काही दिवसात सततच्या पडणाऱ्या पावसापासून काहीसा दिलासा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.पुढील दोन दिवस कोकण घाटमाथा, विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतकेच नाही तर ऑगस्ट महिन्याचे पहिले दहा दिवस कोरडे जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आला आहे.

 

Published on: Jul 30, 2023 09:53 AM
प्रवाशांचे हाल, मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक
‘…तर निवडणुकीआधी काँग्रेससोबत जायचं होतं’, भाजप नेत्यानं उद्धव ठाकरे यांना सुनावलं