काँग्रेसकडून विरोधी पक्षनेत्याची निवड; अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणतात, ‘विरोधी पक्षनेते पदाबाबत…’

| Updated on: Aug 02, 2023 | 7:36 AM

अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेल्याने मविआकचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणारे विरोधी पक्ष नेते पद रिक्त झाले होते. त्यामुळे राज्यातील मानल्या जाणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यावर कोणाचीच नियुक्ती झाली नव्हती. तर यावर काँग्रेसकडून दावा करण्यात आला होता.

मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | गेल्या एक महिन्यापासून राज्याचा विरोधी पक्ष नेता निवडण्यात आला नव्हता. अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेल्याने मविआकचा मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणारे विरोधी पक्ष नेते पद रिक्त झाले होते. त्यामुळे राज्यातील मानल्या जाणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यावर कोणाचीच नियुक्ती झाली नव्हती. तर यावर काँग्रेसकडून दावा करण्यात आला होता. त्यानंतर काल मंगळवारी काँग्रेस नेतृत्वाकडून काँग्रेसचे चंद्रपूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेते पदी नाव जाहिर करण्यात आले. तर त्याबाबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन वडेट्टीवार यांच्या नियुक्तीबाबतचे पत्र दिले. त्यानंतर आता अध्यक्ष नार्वेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीबाबतचे पत्र मला काँग्रसेनं दिलं आहे. पण त्यावर संविधान तरतुदींचा विचार करून निर्णय घेऊ असे अध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तर योग्य त्या गोष्टी तपासून निर्णय घेऊ असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 02, 2023 07:36 AM
“राजकीय भूमिका वेगळी, परिवारातील संवाद वेगळा”; टिळक पुरस्कार कार्यक्रमातील घटनेवरून अजित पवार स्पष्टच बोलले…
शिवसेना-राष्ट्रवादीनंतर काँग्रेसही फुटणार? केसीआर राव यांच्या विधानाने चर्चांना उधाण