‘उरलेली तोंडेही लवकरच बंद होतील’, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुणाला इशारा?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेले आहे की मराठा आरक्षण देण्याची कमिटमेंट आहे त्यावर जी कार्यवाही करायची आहे ती आम्ही करत आहोत. त्याला जेवढा कायदेशीर वेळ द्यावा लागेल तेवढा देऊ. मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला सांगितले आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
पुणे | 9 नोव्हेंबर 2023 : प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे हे राज्यकर्ते म्हणून आमचं कर्तव्य आहे. ही आमचीच नाही तर सर्वांची जबाबदारी आहे की राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू नये. ही जबाबदारी आहे मग ते कोणत्या समाजाचे असो की राजकीय नेते असे गुर्ह्मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सुषमा अंधारे यांनी जे काही ट्विट केले आहे ती सत्यता पडताळून पाहिली जाईल. कोणीही तक्रार केली असेल किंवा व्हिडिओ ट्विट केला असेल त्याची सत्यता पडताळून पाहिली जाईल आणि कारवाई केली जाईल. ललित पाटील प्रकरणात काही जणांची तोंड बंद झालेलीच आहे. उरलेली आता लवकर बंद होतील. ललित पाटील प्रकरणाची अजून थोडी वाट पहा. या प्रकरणात वरवरची कारवाई करून काही होणार नाही याचा मूळ शोधून काढण्याचे प्रयत्न आम्ही सुरू केले आहेत. या प्रकरणातल्या गोष्टी स्पष्ट आलेल्या आहेत. कोणी प्रोटेक्शन दिलं होतं हे सुद्धा समोर आले आहे. आता विरोधकांना बोलायला जागा नाही, असा इशाराही त्यांनी दिला.