Ravindra Chavan | गणबत्ती बाप्पासाठी मुंबई-गोवा महामार्गाची डागडुजी, मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली पाहणी

| Updated on: Aug 26, 2022 | 5:29 PM

Ravindra Chavan | गौरी आणि गणपतींचं आगमन आता अवघ्या पाच ते सात दिवसांवर आले असताना मुंबई-गोवा महामार्गाची डागडुजी करण्यात येत आहे.

Ravindra Chavan | गौरी आणि गणपतींचं (Ganpati)आगमन आता अवघ्या पाच ते सात दिवसांवर आले असताना मुंबई-गोवा महामार्गाची डागडुजी करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी या डागडुजीची पाहणी केली. त्यांनी पनवेलपासून या कामाचा आढावा घेतला. मुंबईच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात भराव घालून खड्डे बुजवण्यात (pits hole Repair) आले असले तरी तळ कोकणात मात्र या महामार्गावर जास्त खड्डे असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर यापूर्वी महामार्ग दुरुस्तीसाठी अवघे दोन ठेकेदार होते. आता जास्त ठेकेदारांकडून ठराविक अंतराची डागडुजी करण्यात आली आहे. गणपती उत्सवाच्या अगोदर चाकरमान्यांना कोकणात सुरक्षित आणि वेळेत जाण्यासाठी युद्धस्तरावर काम सुरु असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.  त्यामुळे गणपतीच्या आगमनामुळे तरी चाकरमान्यांची आणि वाहनधारकांची खड्यातून सूटका होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Published on: Aug 26, 2022 05:29 PM
Eknath Khadse | खडसे कुटुंबियांनी साजरा केला बैलपोळा सण, पुरणपोळीची नैवैद्यही भरवला
Navneet Rana | उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, नवनीत राणांची जहरी टीका