‘सगेसोयरे कायद्याच्या कसोटीवर अजिबात…’, छगन भुजबळ काय म्हणाले

| Updated on: Jan 27, 2024 | 2:04 PM

मराठ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने तातडीने सगेसोयऱ्यांबाबत जीआर काढला आहे. त्यावर आता ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. हा सर्व आय वॉश करणारा प्रकार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. यात ओबीसींवर अन्याय आहे की मराठ्यांना फसविले जात आहे. यचाा आम्ही अभ्यास करीत आहोत. यावर आम्ही हरकती घेणार आहोत. सरकारला यावर दुसरी बाजू देखील आहे हे कळायला हवे असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

मुंबई | 27 जानेवारी 2024 : मराठा आंदोलनकर्त्यांना शांत करण्यासाठी काढलेले पत्रक एक आपण वाचत आहोत आणि समजून घेत आहोत. हा सर्व प्रकार आय वॉश आहे. कोणी पण यावे प्रतिज्ञापत्र करावे आणि सामील व्हावे असा प्रकार आहे. यात ओबीसींवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसविले जातंय याचा अभ्यास आपल्या सर्वांना करावा लागणार आहे. हे सर्व जे आहे ते एकमेकांवर ढकलून किंवा चर्चा करुन उपयोग नाही. तुम्हाला कृती करावी लागेल. तुम्हाला यावर हरकती घ्यावा लागतील. आम्ही आमच्या समता परिषदेतर्फे याच्यावर हरकती घेणार आहोत. या पुढील कारवाई आम्ही करणार आहोत असे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. माझे स्वत:चे असे मत आहे की हे जे सगेसोयरे आहे ते कायद्याच्या कसोटीवर अजिबात टीकणार नाही असे भुजबळ यांनी म्हटले आहे. ओबीसीचे जे काही उरलेले 17 टक्के आरक्षण आहे. त्याच्यात तुम्ही येताय त्याचा तुम्हाला आनंद वाटतोय तुम्ही जिंकलात असे तुम्हाला वाटतंय. पण दुसरी बाजू अशी की यात आता 85 टक्के लोक येतील. परंतू EWS मध्ये मराठ्यांना जे 10 टक्के आरक्षण 85 टक्के मराठ्यांना मिळत होते. ते आता यापुढे मिळणार नाही असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 27, 2024 02:03 PM
मराठ्यांना का ? सर्वांनाच मोफत शिक्षण द्या, छगन भुजबळ यांची मागणी
307 चे गुन्हे कसे काय मागे घेता येणार?, ॲड.गुणरत्न सदावर्ते यांचा सवाल