आरक्षण मागा पण ओबीसीमधून नको, ‘या’ नेत्याची जरांगे पाटील यांना विनंती
१५ प्रमुख मुद्दे यावर चराच झाली त्यावर सरकारने लेखी आरक्षण दिले. दाखले तपासून प्रमाणपत्र द्यावे. ओबीसी जातगणना सरकार करणार आहे. सरकारला जे शक्य आहे तेच करत. जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षण मागावे. पण ते ओबीसीमधून आरक्षण मागताहेत हे चुकीचे आहे.
नागपूर : | 18 ऑक्टोंबर 2023 : जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. या अल्टिमेटमला सहा दिवस बाकी आहेत. अशातच राज्य सरकारने ओबीसींच्या बैठकीचं इतिवृत्त जाहिर केलंय. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसी समाजाच्या १५ मागण्या मान्य करत असल्याचं सरकारनं लेखी स्वरुपात दिलंय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या ओबीसीमधून मराठा आरक्षणाच्या मागणीचं काय होणार? हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं इतिवृत्त जाहिर करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही, असं राज्य सरकारने लेखी दिलंय. त्यामुळे जरांगे पाटील यांची ओबीसीतून आरक्षणाची मागणी चुकीची आहे. त्यांनी अशी मागणी करु नये. त्यांनी वेगळं आरक्षण मागावं, असं माजी मंत्री आणि भाजप नेते परिणय फुके म्हणालेत.
Published on: Oct 18, 2023 05:56 PM