कल्याण ग्रामीणमध्ये पाण्यासाठी रहिवासी आक्रमक, मोर्चा काढण्याचा इशारा
कल्याण ग्रामीणमध्ये पाण्याची समस्या बिकट बनली आहे. पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. जर पाण्याची समस्या दूर झाली नाही तर आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा देखील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
पाणी वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने कल्याण ग्रामीणमधील रहिवासी आक्रमक झाले आहेत. नागरिक पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. पाच बळी गेल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. पाण्याची समस्या न सुटल्यास आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल असा इशारा देखील रहिवाशांकडून देण्यात आला आहे.