मोठी बातमी! डॉ. लहाने यांच्या जागी तात्काळ नवीन नियुक्ती करण्याचे सरकारचे आदेश, राजीनामा मंजूर?
जे.जे. रुग्णालयातील काही डॉक्टर आणि प्राध्यापक विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला होता. या विरोधात त्यांनी आंदोलन करत डॉ.तात्याराव लहाने यांच्या बदलीची मागणी केली होती.
मुंबई : मुंबईतील प्रसिध्द जे.जे.रुग्णालयात सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांच्या आंदोलनामुळे राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला. राज्य सरकारने ज्येष्ठ डॉ.तात्याराव लहाने यांचा राजीनामा सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर डॉ. लहाने यांच्या जागी तात्काळ नवीन नियुक्ती करण्याचे आदेशही सरकारकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर डॉ रागिनी पारेख यांनी दिलेला मुदतपूर्व सेवानिवृत्तीसाठी अर्ज देखील मंजूर करण्यात आला आहे. तर इतर सर्व डॉक्टरांचे देखील राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आरोग्य यंत्रनेवर ताण येऊ नये यासाठी त्यांच्या जागी नव्या डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. जे.जे. रुग्णालयातील काही डॉक्टर आणि प्राध्यापक विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला होता. या विरोधात त्यांनी आंदोलन करत डॉ.तात्याराव लहाने यांच्या बदलीची मागणी केली होती. या आरोपानंतर डॉ.तात्याराव लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिले होते.