‘महानगरपालिकेची चौकशी सुरू आहे’, लवकरच…; उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेना नेत्यानं साधला निशाना

| Updated on: Jul 10, 2023 | 7:44 AM

यासभेत त्यांनी शिवसेना शिंदे गट, अजित पवार आणि भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. तसेच यावेळी यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्यावर निशाना साधत टीकास्त्र सोडलं. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचं म्हटलं होतं.

यवतमाळ : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात पोहरादेवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांची यवतमाळमधील दिग्रस येथे सभा झाली. यासभेत त्यांनी शिवसेना शिंदे गट, अजित पवार आणि भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. तसेच यावेळी यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्यावर निशाना साधत टीकास्त्र सोडलं. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून खासदार गवळी यांनी आपल्यावर आरोप होते. ते सिद्ध झालेले नाहीत. पण चौकशी झाली हे खरं आहे. पण आता महानगरपालिकेवर कोविड काळातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. लवकरच दूध का दूध, पाणी का पाणी होईल असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला आहे.

Published on: Jul 10, 2023 07:44 AM
बाळासाहेबांची ‘ती’ इच्छा अपूर्णच! राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांवर नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट
‘सीनियर असल्यामुळे भाजपची ऑफर होती’, राष्ट्रवादी नेत्याचा मोठा खुलासा