राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात, ‘पवार कार्यक्रमाला उपस्थित राहो न राहो चिंता नाही’
मात्र यापुर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांनी विचार करावा अशी विनंती केली आहे. तर या पुरस्कार सोहळ्याला जाऊ नये अशी मागणी केली होती. दरम्यान या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार की नाही यावरून चर्चा रंगत आहेत.
अहमदनगर, 01 ऑगस्ट 2023 | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पुणे दौरा आहे. त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोसह आणखी काही प्रकल्पांचे उद्धाटन होणार आहे. तसेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. मात्र यापुर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांनी विचार करावा अशी विनंती केली आहे. तर या पुरस्कार सोहळ्याला जाऊ नये अशी मागणी केली होती. दरम्यान या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार की नाही यावरून चर्चा रंगत आहेत. तर राष्ट्रवादीच्याच गटाकडून पंतप्रधान मोदी यांना विरोध होताना दिसतो आहे. त्यावरूनच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टोमना मारला आहे. यावेळी विखे पाटील यांनी, पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणं किंवा न राहणं यामुळे त्या कार्यक्रमावर काहीही परिणाम होणार नाही. कुणी या कार्यक्रमाला उपस्थित राहो अगर न राहो याची आम्हाला चिंता नाही, असंही विखे पाटील म्हणाले आहेत.