चक्क 50 टक्के सवलत!; महामंडळाप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना रिक्षामामाची सवलत; होतय कौतुक
डोंबिवलीतील एका रिक्षाचालकाला सध्या सगळे सलाम कराना आणि त्याचे कौतुक करताना दिसत आहे. कारणही काही तसेच आहे. रिक्षाचालक रुपेश रेपाळ हे राजाजी पथ परीसरात राहतात. त्यांच्या रिक्षा वर एक सूचना लिहिण्यात आली आहे. हा संदेश सध्या सर्वांच लक्ष वेधत आहे.
डोंबिवली : आजकाल रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यामध्ये वाद आपण अनेकदा पहातो. त्यात कल्याण डोंबिवली शहरात चाकरमानी बहुतांश रिक्षांचाच वापर करतात. मात्र डोंबिवलीतील एका रिक्षाचालकाला सध्या सगळे सलाम कराना आणि त्याचे कौतुक करताना दिसत आहे. कारणही काही तसेच आहे. रिक्षाचालक रुपेश रेपाळ हे राजाजी पथ परीसरात राहतात. त्यांच्या रिक्षा वर एक सूचना लिहिण्यात आली आहे. हा संदेश सध्या सर्वांच लक्ष वेधत आहे. त्यावर ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करताना 50 टक्के सवलत असं लिहलं आहे. रेपाळ हे स्वतः भाड्याच्या घरात राहतात. त्यांचा पत्नी, आई, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांचा उदर्निवाह हा रिक्षा धंद्यावरच चालतो. तरिही समाजासाठी काहीतरी करायला हवं या एकाच उद्देशाने ते लोकांना कोरोना काळापासून मदत करत आहेत. आता ही त्यांनी तशीच मदत करायला सुरूवात केली आहे. एसटी महामंडळ आणि बेस्ट या ज्येष्ठ नागरिकांना सवलत देतातच त्याप्रमाणे त्यांनीही प्रवासात सवलत दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना थेट 50 टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे त्यांचा समाजात एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे. 26 जानेवारीपासून त्यांनी ज्येष्ठांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. सूरवातीला 23 रुपये मीटर पडते. मात्र ज्येष्ठांकडून ते 11 रुपये घेतात. त्यांच्या या सेवेच सर्वच स्तरातून कौतुक केलं जातं आहे.