राज्यात लम्पी आजाराचा धोका वाढला, अहमदनगरमध्ये 17 जनावरांचा मृत्यू
देशभरात थैमान घालणाऱ्या लम्पी आजाराचा धोका महाराष्ट्रातही वाढला आहे. लम्पी आजारामुळे अहमदनगरमध्ये 17 जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
देशभरात थैमान घालणाऱ्या लम्पी आजाराचा धोका महाराष्ट्रातही वाढला आहे. लम्पी आजारामुळे अहमदनगरमध्ये 17 जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. लम्पीच्या धास्तीमुळे महापालिकेने तबेळे आणि गोशाळांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी डॉक्टरांची पथके तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डातील तबेले आणि गोशाळांमध्ये जाऊन जनावरांची तपासणी केली जाणार आहे. तसेच त्याची माहिती एकत्रित करण्यात येणार असून या तबेले आणि गोशाळांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
Published on: Sep 15, 2022 10:06 AM