Mumbai | मुलुंडमधील दरोड्याची उकल, आंतरराज्य कुख्यात टोळी जेरबंद

| Updated on: Feb 08, 2022 | 10:54 AM

मुलुंड (Mulund) मध्ये तीन दिवसांपूर्वी पडलेल्या दरोड्याची अखेर उकल झाली आहे.या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तब्बल 8 आंतरराज्य कुख्यात टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.

मुलुंड (Mulund) मध्ये तीन दिवसांपूर्वी पडलेल्या दरोड्याची अखेर उकल झाली आहे.या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तब्बल 8 आंतरराज्य कुख्यात टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.स्वतः मुंबई पोलिसांचे सह आयुक्त विश्वास नांगरे (Vishwas Nagre Patil )पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या दरोड्याबाबत माहिती दिली. तीन दिवसांपूर्वी मुलुंड च्या पाच रस्ता येथे व्ही पी इंटरप्रयजेस या अंगाडीया वर दरोडा पडला होता.चार बंदूक धारी या ऑफिस मध्ये घुसले त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून तब्बल ७० लाख रुपये लूट करून पळ काढला होता.ही घटना इथल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती.या वरून मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि तब्बल १२ पथके या टोळीच्या मागावर लागली.
Published on: Feb 08, 2022 10:54 AM
Shivaji Park ला शिवाजी पार्कचं ठेवावं, त्याचं स्मशानभूमी करु नका : प्रकाश आंबेडकर
शॉर्ट सर्किटमुळे 30 ते 35 एकरातील ऊस जळून खाक