रुपाली चाकणकर यांच्या टिकेला रोहिणी खडसे याचं जोरदार प्रत्युत्तर म्हणाल्या…

| Updated on: Jan 01, 2024 | 8:37 PM

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना अजितदादांनी निवडून आणलं आहे असा दावा केला होता. यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई | 1 जानेवारी 2023 : खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना अजितदादांनी निवडून आणले असे अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते. या सुप्रिया सुळे गेली 15 वर्षे अजितदादामुळे निवडून येत आहेत. आता अजितदादा मदतीला नाहीत म्हणूनच त्यांनी मतदार संघात दहा महिने मुक्काम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खासदार अमोल कोल्हे देखील अजितदादा यांच्यामुळेच निवडून आल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते. अफाट आणि भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाला रिकाम्या खुर्च्या होत्या अशी टिका रुपाली चाकणकर यांनी केली होती. त्याला आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना अजितदादांनीच निवडून आणले आहे असे काहींचे म्हणणे आहे. माझा त्यांना एक सांगणं आहे, पहिले तुम्हाला किमान नगरसेवक पदासाठी तुम्हाला निवडून आणून दाखवावं, मग आम्ही बाकीच्या तुमच्या गोष्टी मान्य करु असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 01, 2024 08:36 PM
Video | मुंबईची आर्थिक राजधानी ही प्रतिमा पुसायचा प्रयत्न, अरविंद सावंत यांची सरकारवर टीका
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीत चुरस, किरण सामंत यांच्या व्हॉट्सअप स्टेटसने गोंधळ