उदय सामंत यांचं ‘हे’ आश्वासन अन् रोहित पवार यांच्याकडून आंदोलन मागे;नेमकं प्रकरण काय? पाहा व्हिडीओ…
कर्जत जामखेडमधील युवकांचा रोजगार आणि स्थानिकांचे प्रश्न यासंदर्भात रोहित पवार यांचं उपोषण केलं. यानंतर कर्जत जामखेड MIDC प्रश्नी मंगळवारी बैठकीचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिल्यानंतर रोहित पवारांनी विधानभवनातले शिवरायांच्या पुतळ्याजवळ सुरु केलेलं आंदोलन मागे घेतले.
मुंबई, 24 जुलै 2023 | आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. या अधिविशेन काळात कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रोहित पवार हे उपोषणाला बसले. कर्जत जामखेडमधील युवकांचा रोजगार आणि स्थानिकांचे प्रश्न यासंदर्भात उपोषण केलं.. वेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक विनंतीही केली आहे. दरम्यान यानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी त्यांची समजूत काढत त्यांना आश्वासन दिल्यानंतर रोहित पवारांनी आंदोलन मागे घेतलं.
Published on: Jul 24, 2023 01:48 PM