“अजित पवार यांनी फसवून आमदारांना सोबत नेलं”, रोहित पवार यांचा आरोप
अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. बंडानंतर अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे.अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. बंडानंतर अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर टीका केली आहे. “एवढ्या मोठ्या नेत्याने बोलवले तर आमदार जातात. सह्या करतात. मात्र तिथला प्रकार लक्षात येताचकाही आमदार तिथून निघून आले. भाजप कडून शिवसेना आणि राष्ट्रवादीला फोडण्यात आले आहे. राज्याच्या राजकारणाची पातळी खालावली आहे. लोकांचा विश्वास राजकीय नेत्यांवरून उडत आहे. लोक चिन्हाला पाहून नाहीत, तर पवार साहेब यांना आणि त्यांच्या व्हिजनला पाहून मत करतात.तुमच्याकडे पवार साहेबांचे व्हिजन नसेल तर चिन्ह असून ऊपयोग नाही.ऑक्टोबर असेल किंवा डिसेंबर परिवर्तन नक्की होईल,” रोहित पवार म्हणाले.