“मंत्रिपद मिळणार की नाही याचा पाठपुरावा करा, उगीच…; रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांना सुनावलं

| Updated on: Jul 25, 2023 | 9:00 AM

कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी सुरू व्हावी. यातून तरूणांना रोजगार मिळेल, असं म्हणत रोहित पवार यांनी काल विधिमंडळ परिसरात उपोषण केलं. त्यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली. रोहित पवार ही सगळी नाटकं करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षे एमायडीसी नको होती का?, असा सवाल शिरसाट यांनी विचारला. यावरून रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांना सुनावलं आहे.

मुंबई, 25 जुलै 2023 | कर्जत जामखेडमध्ये एमआयडीसी सुरू व्हावी. यातून तरूणांना रोजगार मिळेल, असं म्हणत रोहित पवार यांनी काल विधिमंडळ परिसरात उपोषण केलं. त्यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली. रोहित पवार ही सगळी नाटकं करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षे एमायडीसी नको होती का?, असा सवाल शिरसाट यांनी विचारला. यावरून रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांना सुनावलं आहे. ते म्हणाले की, “संजय शिरसाट यांना माझ्या मतदार संघाविषयी काय माहिती आहे? त्यांना कर्जत-जामखेडबाबात बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही तुम्हाला मंत्रिपद मिळणार आहे की नाही, कधी मिळेल, यासाठी पाठपुरावा करा, नको त्या गोष्टींमध्ये उगीच लक्ष घालू नका.”

Published on: Jul 25, 2023 09:00 AM
‘निधी वाटपावरून दुजाभाव केला जातोय’; वायकर यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेत्याचाही न्यायालयात जाण्याचा इशारा
पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! चिपळूणमधील ‘या’ धबधब्यावर पर्यटकांना बंदी