Rohit Pawar : ‘माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला’, तरुणांच्या नेतृत्वावर रोहित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

| Updated on: Jul 24, 2022 | 7:07 PM

2024 नंतर राजकारणातील निर्णय हे तरुणांना घ्यायचे आहेत. त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार हे आपल्याला मार्गदर्शन करतील, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले होते.

अहमदनगर : मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. राजकारणात (Politics) काम करत असताना काही विधाने आम्ही करतो. मात्र काहीजणांना ते कळत नाही, म्हणून त्याचा विपर्यास केला जातो, असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत. 2024 नंतर राजकारणातील निर्णय हे तरुणांना घ्यायचे आहेत. त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार हे आपल्याला मार्गदर्शन करतील, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले होते. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यावर बोलताना आपल्या वक्तव्याचा काही लोकांनी चुकीचा अर्थ काढला, असे ते म्हणाले. सध्या केंद्र सरकारकडून लोकशाहीचा (Democracy) गळा घोटण्याचे काम सुरू आहे. जर लोकशाही वाचवायची असेल तर ते तरुणांच्या हाती आहे. याच उद्देशाने मी बोललो होतो, असे स्पष्टीकरण आमदार पवारांनी दिले आहे.

Published on: Jul 24, 2022 07:06 PM
Hari Narke : एका बाजूला बाळासाहेबांचं नाव घ्यायचं, दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मुलावर टीका करायची हा खोटारडेपणा, हरी नरकेंचं टीकास्त्र
ShivSena : एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र यावेत, चंद्रकांत रघुवंशी यांचे मत