‘उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी या सरकारने काय केलं?’; रोहित पवार यांची आगपाखड

| Updated on: Aug 03, 2023 | 2:39 PM

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपुर्वीच घोषित केलं होतं. पण अजून त्यावर श्वेत पत्रिका काढण्यात आलेली नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका सरकारवर निशाना साधला आहे.

मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | राज्यातील उद्योग धंद्याच्यासाठी श्वेत पत्रिका काढू असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपुर्वीच घोषित केलं होतं. पण अजून त्यावर श्वेत पत्रिका काढण्यात आलेली नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका सरकारवर निशाना साधला आहे. तसेच टीका करताना, उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी या सरकारने काय केलं असा सवाल केला आहे. तर काय केलं हे सरकारणं सांगणं गरजेचं असताना मागच्या सरकारवरती खापर फोडण्याचे काम शिंदे-फडणवीस-पवार सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर याच सरकारच्या काळात अनेक उद्योग-धंदे जे आहेत ते राज्या बाहेर गेलेले आहेत अलीकडेच कर्नाटक मध्ये 5 हजार कोटींचा सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट गेला. तो तेथे सुरूही झाला. तमिळनाडूमध्ये असा प्रोजेक्ट सुरू झाला आहे. जागतिक सेमी कंडक्टर परिषदे करता आपल्या राज्यातून कोण प्रतिनिधी गेलेलं यासंदर्भात सरकारला काही माहिती आहे का? असा टोला लगावला आहे. तर आता या सरकारला श्वेतपत्रिका काढण्याच सुचलेलं आहे अशी टीका केली आहे.

Published on: Aug 03, 2023 02:14 PM
विजय वडेट्टीवार नवे विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा
“आम्ही विजय वडेट्टीवार यांच्यासोबत हात मिळवला तरी काहीजण घाबरले”, मुख्यमंत्री शिंदे यांचा मविआला टोला