बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन

| Updated on: Sep 26, 2024 | 6:39 PM

जामखेड तालुक्यातील एसआरपीएफ केंद्राचे उद्घाटन करणार असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जाहीर केले होते. परंतू प्रशासानाने येथे मोठा बंदोबस्त लावत त्यांना रोखले तरीही त्यांनी गेटवरुन फित कापत या केंद्राचं लोकार्पण झाल्याचे जाहीर केले आहे.

Follow us on

कर्जत – जामखेड येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार यांच्या निधीतून आणि प्रयत्नातून सुरु होणाऱ्या जामखेड तालुक्यातील कुसडगावाच्या SRPF केंद्राची पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदार रोहीत पवार यांच्या कार्यकर्त्यात आणि पोलिसांत आज मोठी झटापट झाली. या केंद्राची पाहणी करणार असल्याचे ट्वीट रोहीत पवार यांनी केले होते. त्यानंतर येथे प्रशासाने मोठा बंदोबस्त लावला. त्यानंतर रोहीत पवार येथे कार्यकर्त्यांसह दाखल झाले. त्यांनी बंदी आदेश झुगारुन लावत गेट वरुन पत्रकारासमोर फित कापून या केंद्राचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. या संदर्भात रोहीत पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. रोहीत पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलेय की राज्यात महिला भगिनी आणि चिमुकल्या मुलींवर खुलेआम अत्याचार होतात… दिवसाढवळ्या खून पडतात… कायदा व सुव्यवस्थेचे न भूतो न भविष्यती तीन तेरा वाजले.. तरी तिकडं लक्ष द्यायला राज्याच्या गृहमंत्र्यांना वेळ नाही… मात्र आम्ही मंजूर करून आणलेल्या आणि पूर्ण केलेल्या कुसडगावच्या (ता. जामखेड) #SRPF केंद्राची पाहणी करु न देण्यासाठी असा शेकडो पोलिसांचा बंदोबस्त लावला जातोय..तुम्ही कितीही लावा बंदोबस्त… स्वाभिमानी जनताच करणार तुमचा बंदोबस्त असे म्हटले आहे.