Rohit Pawar : मनीष  सिसोदिया यांच्यावरील कारवाईचा निषेध, बदनाम करण्याचा प्रयत्न- आमदार रोहित पवार

| Updated on: Aug 22, 2022 | 10:45 AM

'दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे चांगले काम करत असून, त्यांनी दिल्लीकरांना आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र सध्या त्यांच्यासोबत राजकारण चालू आहे.'

मुंबई :  आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिल्लीचे (Delhi) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यावर झालेल्या कारवाईवरुन केंद्रावर हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की, ‘दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे चांगले काम करत असून, त्यांनी दिल्लीकरांना आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र सध्या त्यांच्यासोबत राजकारण चालू आहे. त्यांच्या घरावर सीबीआय छापेमारी करत आहे. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा आम्ही निषेध करतो. जनता हे सर्व पहात असून, निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर मिळेल असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. याचवेळी आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर आरोप केला आहे. त्यांनी दोन तीन बॅकांना चुना लावलाय, असा आरोपही रोहित पवार यांनी केलाय

Published on: Aug 22, 2022 10:44 AM
Sanjay Raut: संजय राऊत यांच्या कोठडीवर आज सुनावणी
Mohit kamboj : बारामती अ‍ॅग्रोचा अभ्यास सुरु, लवकरच तपशील देणार, कंबोज यांचा इशारा