Rohit Pawar : मोहित कंबोज यांनी दोन तीन बँकांना चुना लावला, आमदार रोहित पवारांची टीका

| Updated on: Aug 22, 2022 | 10:32 AM

आमदार रोहित पवार यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईवरून देखील केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. मोहित कंबोज यांनी काही दिवसांपूर्वी सिंचन घोटाळ्यावर ट्विट केलं होतं. सविस्तर वाचा...

मुंबई :  आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की, ‘मोहित कंबोज यांनी ओव्हार्सिज बँकेत 52 कोटी रुपयांचा भ्रष्टाचर केल्याचा विषय चर्चेत आहे. त्यांनी इतरही दोन तीन बँकांना चुना लावला आहे. मग अशा चुना लावणाऱ्या व्यक्तीच्या ट्विटला किती महत्त्व द्यायचे? हे समजून घेतले पाहिजे,’ असं म्हणत आमदार रोहित पवारांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केलीय. यावेळी आमदार रोहित पवार यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईवरून देखील केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. मोहित कंबोज यांनी काही दिवसांपूर्वी सिंचन घोटाळ्यावर ट्विट केलं होतं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचं म्हटलं होतं.

Published on: Aug 22, 2022 10:32 AM
Vinayak Raut: काय ते साँग, 8 वेळा आपटलं,ठाकरेंमुळे आमदार झालं- विनायक राऊत
Sanjay Raut: संजय राऊत यांच्या कोठडीवर आज सुनावणी