“अहमदनगरच्या नामांतरावर राजकारण नको, याचं श्रेय…”, रोहित पवार यांची प्रतिक्रिया
अहमदनगरच्या नामांतरावर राजकारण नको, यासाठी सर्वांचं योगदान असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. तसेच पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या नियोजनात आम्हाला घेतलं नाही, कार्यक्रमासाठी आम्हाला परवानगी दिली नाही, दुजाभाव केला गेला, असाही आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
अहमदनगर : अहमदनगरच्या नामांतरावर राजकारण नको, यासाठी सर्वांचं योगदान असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. तसेच पुण्यशोल्क अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या नियोजनात आम्हाला घेतलं नाही, कार्यक्रमासाठी आम्हाला परवानगी दिली नाही, दुजाभाव केला गेला, असाही आरोप रोहित पवार यांनी केला आहे. “अहिल्यादेवींचं नाव दिल्याच्या निर्णयाचं स्वागत आहे. यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. त्यामुळे यावर राजकारण कोणी करु नये.श्रेय प्रत्येकाला जातं. बारामतीत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्याबाईंचं नाव देण्याचा निर्णय घेतलाय, त्याचंही स्वागत आहे. नामकरण हा महत्वाचा विषय असला, तरी अन्यही प्रश्न आहेत.शिक्षण,मेंढपाळांचे प्रश्न यावर काही घोषणा झाल्या असत्या तर त्याला वेगळं महत्व प्राप्त झालं असतं. धनगर सामाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा”, असंही रोहित पवार म्हणाले.