अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या प्रमोशनवर नाराज? रोहित पवार यांचं मोठं विधान; म्हणाले, “दादा स्वतः असं…”
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटामधून दावे-प्रतिदावे केले जात आहे. दरम्यान शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या बंडावर महत्वाचं विधान केलं आहे.
मुंबई: अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटामधून दावे-प्रतिदावे केले जात आहे. दरम्यान शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या बंडावर महत्वाचं विधान केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या प्रमोशनवर अजित पवार नाराज असल्याची चर्चांना काही तथ्य नाही. अशा चर्चा करणे योग्य नाही. दादा स्वतः असं काही बोलले नाहीत. भाजपला कुटुंब आणि पार्टी फोडायची होती, त्यांना वाटत यश आलं आणि यामुळे मत विभाजित होईल. मात्र महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील राजकारण भाजपने खराब केले आहे, हे लोकांना पटलेले नाही.
Published on: Jul 07, 2023 07:42 AM